भांब (राजा) येथील बँकेचा मनमानी कारभार, बँक वेळेच्या पूर्वीच बंद – बँक कर्मचारी मॅनेजर फरार.

जिल्हा प्रतिनिधी ; गेल्या अनेक वर्षांपासून भांब (राजा) येथील (आदीलाबाद बँक) त्यानंतर नाव बदलले व इंडियन बँक – असे नाव पडले.

परंतु ग्रामीण भागातील गोरगरिबांची संजीवनी असणारी ही बँक आज रोजी त्यात सर्वसामान्य माणसाची डोकेदुखी ठरली. इथे असलेले बँकेतील कर्मचारी कॅशियर मॅनेजर यांचा चालतो मनमानी कार्यभार तसेच नेहमीच सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचे काम या बँकेतील मॅनेजर आणि कॅशियर हे करतात.

आरबीआयच्या रूल्स आणि रेगुलेशन नुसार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बँक ही सुरू असायला पाहिजे परंतु या ठिकाणी सकाळी 11 वाजता बँकेचा कार्यभार चालू होतो आणि संध्याकाळी चार वाजता बँकेच्या गेटला कुलूप लागते.

One thought on “भांब (राजा) येथील बँकेचा मनमानी कारभार, बँक वेळेच्या पूर्वीच बंद – बँक कर्मचारी मॅनेजर फरार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!