जिल्हापोलीस प्रशासन घेताय झोपेचे सोंग. दिवसाढवळ्या शस्त्रधारी तरुणांचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

संपादकीय ; पुसद तालुक्यात गुन्हेगारीने गाठलाय कळस जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष.

तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीने आणि दिवसा ढवळ्या शस्त्र बाळगणाऱ्या तरुण गुन्हेगारामुळे नागरिक भयभीत झाले आहे. तलवार अग्निशस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दहशत पसरवणाऱ्या हातात बंदूक घेऊन येणाऱ्यांमुळे खुनी हल्ले व खुणाच्या घटना यवतमाळ जिल्ह्यात तसेच पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

अशा अट्टल गुन्हेगारी क्षेत्रातील गुन्हेगारांवर कायदेशीर अंमलबजावणीची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे अन्यथा अराजकतेची परिसरात भीती व्यक्त होत आहे.

पुसद तालुका आणि शहरातील ग्रामीण व शहरी भागात रोजच लहान-मोठे गुन्हे घडत असून त्यात नागरिकांमध्ये चिंताजनक भर पडली आहे ती शस्त्र बाळगणाऱ्या तरुण गुन्हेगारांची दिवसा सुद्धा तलवार बंधूक शस्त्रे आणि लहान मोठे शस्त्र घेऊन अनेक तरुण उघडपणे शहराच्या ठिकाणी वावरताना दिसत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आताचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि आधीचे पोलीस अधीक्षक पवन बनसोड करतात राजकारन्यांची चाक्री!

अनेक ठिकाणी या शस्त्रांचा धाक दाखवण्यासाठी किंवा प्रत्यक्ष हल्ला करण्यासाठी वापर होत आहे रात्रीच्या वेळी गावाकडे परतणारे यात्रेकरू घरी जात असतांना त्यांना रस्त्यात लुटण्याच्याही बऱ्याचशा घटना दिसून येत आहे परंतु पुसद तालुका पोलीस प्रशासन तसेच यवतमाळ जिल्ह्यात होणाऱ्या घटना यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे यवतमाळ जिल्यात वाढत्या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते.

कोणी एखांदा तक्रारदार जर पोलीस स्टेशनला गेला तक्रार द्यायला तर पोलीस त्याला त्याची समस्या ऐकून न घेता त्याला धाक धप्पट करण्याचा प्रकारही यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याचश्या पोलीस स्टेशनमध्ये दिसून येत आहे या पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे तक्रारदार हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याकरता जाण्यासही मात्र टाळाटाळ करीत आहे जणू नागरिकांचा पोलिसांवरून विश्वासच उडाला असे चित्रही यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुसद व यवतमाळ तालुक्यामध्ये सुद्धा दिसून येत आहे.

एखाद्या गुन्हेगाराची किंवा एखाद्या घटनेची सामान्य नागरिकांनी तक्रार दिली तर पोलीस त्याला सुरक्षा देत नाही परंतु तक्रारदारा बद्दल गुन्हेगारालाच पोलीस सर्व त्याच्या विषयी माहिती देतो हे चित्रही आपल्याला यवतमाळ जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनामध्ये वारंवार दिसून येते. तसेच महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनामध्ये आज होत असलेल्या घडामोडींमध्ये दिसून येते.

तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगारांना बळ मिळत असून ते अधिक ताकतवर असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे हे तरुण गुन्हेगार रस्त्यावर किंवा मोहल्यामध्ये शस्त्र घेऊन खुलेआम येतात हुडकून घालतात आणि वेळप्रसंगी हल्ला करण्यासही कसरत नाही.

त्यामुळे समाजात त्यांची दहशत निर्माण होत आहे यातूनच गुन्हेगारी वाढत आहे तसेच गुन्हेगार हे नवीन पिढी चे आदर्श ठरत असून सध्याची पिढी भरकटून गुन्हेगारीकडे वळत आहे.

निष्पाप जनतेला त्रास देण्याचे प्रकारही होत असलेल्या गुन्हेगारीतून जिल्ह्यामध्ये वाढत आहेत.

अशा बऱ्याचशा घटना आहे का ज्या महिला मुलींवरती अत्याचार सुद्धा होतात परंतु त्या समोर येत नाही याला कुठेतरी पोलीस प्रशासन व महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी जबाबदार असल्याचेही आपल्याला दिसून येते. ही वाढती गुन्हेगारी यावर वेळीतच नियंत्रण आणले नाही तर भविष्यात यवतमाळ जिल्ह्यात टोळी युद्ध आणि सामाजिक अराजक्ता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही अशी भीती नागरिकांनकडून व्यक्त होत आहे.

पोलीस प्रशासनाने कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी व चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!