
संपादकीय : गेल्या वर्षभरापासून यवतमाळ येथे पत्रकारांवरती जीवघेणे हमले होत आहे. परंतु यवतमाळ येथील पोलीस प्रशासन गुन्हेगारांना क्षय देताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. पत्रकार हा देशाचा चौथा महत्त्वाचा स्तंभ आहे समाजाचा आरसा आहे त्याची सुरक्षा करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे. परंतु कायद्याचे संरक्षण करते पोलीसच जर पत्रकारांवर हमले करत असेल. तर हमलावरांना पोलीसच जर अभयदान देत असेल तर सर्वसामान्य माणसाचे काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो!

गेल्या वर्षभरापासून लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान वटबोरी येथे गुंडांच्या वतीने संगम समाचार चे मुख्यसंपादक श्री दिगंबरभाऊ टीआर अवथळे (पाटील) यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीला मागून धडक देऊन त्यांच्यावर हमला करण्यात आला होता. त्या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्रकार संपादक यांच्या वतीने रिपोर्टही देण्यात आला होता.

परंतु पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने अद्यापही कार्यवाही करण्यात आलेली नाही. हमलावर आरोपी असलेले गुन्हेगार जंगलाल बैठवार, रमेश झांबरे, मोहन घाटोळ, आनंद चौकोने, हे परिसरात फिरतांनी दिसतात.

प्रसारमाध्यमात पत्रकारांच्या वतीने बातमीपत्र हमलावरांच्या नावासहित प्रसारित करूनही यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनं चे ठाणेदार प्रशांत कावरे तसेच त्यांचे सहकारी पोलिसांच्या वतीने घडलेल्या गुण्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्नही झाल्याचं दिसून येते.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेदरम्यान पत्रकार विवेक गावंडे व संजय राठोड यांना सभेत जाण्याकरिता पोलिसांच्या वतीने रोखण्यात आले. परंतु पत्रकारांकडे सर्व आयडी प्रूफ असतांना सुद्धा यवतमाळ पोलिसांची मुजरशाही व गुंडागर्दी ही पत्रकारांवर दिसून आली. पोलिसांनी दिलेली पत्रकारांना शिवीगाळ व पत्रकारांचा केलेला अपमान तसेच पत्रकारांवरती पोलिसांनी हातापायी करत केलेला गुन्हा अशा पोलिसांवरती पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत ठोस कार्यवाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावी.

तसेच यापुढे महाराष्ट्रातील पत्रकार यांच्यावरती कुठल्याही प्रकारची पोलिसांच्या वतीने दडपशाही न होता त्यांचा अपमान न करता महाराष्ट्र सरकारच्या वतीने पत्रकारांबाबत दखल घ्यावी.TV9 मराठीचे डिजिटल मीडिया चे पत्रकार विवेक गावंडे दुसरीकडे साम टीव्ही मराठी डिजिटल मीडियाचे पत्रकार संजय राठोड यवतमाळ येथील एकनाथ शिंदे च्या आभार सभेदरम्यान आढावा घेण्याकरिता गेले असता त्यांच्यावरती पोलिसांच्या वतीने अर्वाच्य भाषा वापरत अवमान करत हाणामारी केल्याचा प्रकारही दिसून आला अशा पोलिसांवरती कळक कारवाई करण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने तसेच संगम समाचार डिजिटल मीडियाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला सूचना व विनंती जाहीर. देशामध्ये गेल्या वर्षभरापासून पत्रकारांवरती अनेक हमले होत असून केंद्र सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे तसेच पत्रकारांवर कोणी हमला जर करत असेल तो कुठल्याही क्षेत्रातील असो अशा व्यक्तींवरती केंद्र सरकारच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्यात बदल करत कळक कार्यवाही करण्यात यावी.




