
तालुका प्रतिनिधी आदेश साठे : 28 जानेवारी 2025 पासून सुरू असलेले आदिवासी समाजाचे गावाच्या विकासाकरिता आमरण बेमुद्दत उपोषण भीमकुंड टेकळी येथील अखेर घाटांची तालुका प्रशासनाच्या वतीने सोडविण्यात आले.
संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या वतीने घाटंजी तालुक्यातील शेवटचं असलेलं गाव भीमकुंड टेकडी येथील आदिवासी समाजाच्या विकासाकरिता आमरण मे मुदत उपोषण हे सुरू करण्यात आले होते. परंतु उपोषणाला पाचव्या दिवशी यश मिळाले घाटंजीचे संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री उमेशभाऊ साठे यांच्या इशारानंतर घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने तातडीने दखल घेत उपोषणकर्त्यांचे सर्व विषय ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती तहसील कार्यालय तहसीलदार गटविकास अधिकारी ग्रामसेवक पटवारी येथील सर्व अधिकारी यांनी तातडीने पंधरा वर्षापासून वास्तव्यास असलेल्या भिमकुंड टेकडी येथील आदिवासी समाजाचे प्रश्न मार्गी लावून उपोषण सोडविण्यात आले.


