
तालुका प्रतिनिधी आदेश साठे : घाटंजी तहसीलदार विजय साळवे यांनी केला उपोषण करते आदिवासी समाजाचा अपमान. घाटंजीच्या आदिवासी समाज बोगस आहे अशा अर्वाच्य भाषा वापरत आदिवासी समाजाचा अपमान केला.
भिमकुंड टेकडी येथे आदिवासी समाजाचे गेल्या पाच दिवसांपासून आम्रण बेमुदत उपोषण सुरु आहे परंतु त्या उपोषणादरम्यान घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने कुठलेही ठोस पाऊल न उचलता त्यांचे उपोषण सोडवण्याचा प्रयत्न न करता त्यांची माती उलट भडकवण्याचा प्रयत्न करत आमदार राजू तोडसाम यांच्या आदेशाला तहसीलदार घाटंजी विजय साळवे यांनी केराची टोपली दाखवल्याचे इथं निष्पन्न होते. त्यानंतर उपोषण करते आदिवासी समाजाच्या महिला यांनी घाटंजी तालुका तहसीलदार विजय साळवे यांची झाडाझडती घेत त्यांना उपोषणकर्त्या महिलांनी पाणी पाजले.

फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी आर एफ ओ तसेच घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे घाटंजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ग्रामसेवक पटवारी सरपंच उपसरपंच गावातील पोलीस पाटील यासह उपोषणकर्त्यांची भेट घेण्यात दिनांक 31 मार्च 2025 रोजी आली होती दुपारी 03:00 वाजताच्या दरम्यान.