
तालुका प्रतिनिधी आदेश साठे : संगम समाचार च्या बातमीनंतर, केळापूर/आर्णी घाटंजी या विधानसभेचे आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी घेतली तिसऱ्या दिवशीच रात्री 10:30 वाजता भिमकुंड (टेकडी) येथे सुरू असलेल्या संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या आमरण बेमुदत उपोषणाची दखल.

गेल्या 16 ते 17 वर्षापासून वंचित असलेले आदिवासी समाजाचे भिमकुंड टेकडी हे गाव. परंतु शासन प्रशासनाच्या वतीने विकासासंदर्भात कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना न राबवता आदिवासी समाजाचे शोषण कसं करता येईल याच सूळ हेतूने घाटंजी तालुका प्रशासनाच्या वतीने स्थानिक लोकल राजकारणांच्या वतीने आज पर्यंत शोषणच करण्यात आले होते.

परंतु भिमकुंड (टेकडी) येथील स्थानिक रहिवाशी तसेच संगम बहुउद्देशीय चे पदाधिकारी यांच्यावतीने दिनांक 28 मार्च 2025 पासून आमरण मे मुदत उपोषण गावातच मांडून त्या आंदोलनाला सुरुवात केली होती.या आंदोलनाचा सर्व आढावा संगम समाचार या मीडियाच्या वतीने प्रकाशित करून जन्मदमात पोहोचविण्याचं काम केलं होतं व त्याच बातमीपत्राची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूभाऊ तोडसाम केळापूर आर्मी विधानसभा क्षेत्र यांनी मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री 10:30 वाजता भिमकुंड टेकडी येथे सुरू असलेल्या आमरण बेमुदत उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व सर्व प्रशासकीय अधिकारी यांना फोन द्वारे सूचनाही दिल्या.परंतु आमरण बेमुदत उपोषण हे असेच सुरू आहे.
उपोषण सोडविण्यात आलेले नाही संघटनेचे पदाधिकारी व गावकऱ्यांच्या वतीने निर्णय घेऊन जो पर्यंत लेखी स्वरूपात घाटंजी तालुका प्रशासन देत नाही गावाच्या विकासासंदर्भात तोपर्यंत हे आमरण बे मुद्दत उपोषण असेच सुरू राहील.
