
संपादकीय : यवतमाळ जिल्ह्यातील निराधार असलेले लाभार्थी यांना गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेच नाही. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना वारंवार यां ना त्या कारणावरून चकरा माराव्या लागतात. ही परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उद्भवलेली आहे.
जेव्हापासून लाडकी बहीण ही योजना निघाली आहे तेव्हापासून निराधार असलेल्या परिवाराकडे महाराष्ट्र शासनाच्या वतीने दुर्लक्ष होतांना आपल्याला दिसून येते.

मागील तीन महिन्यांपासून निराधार लाभार्थी यांना मानधन मिळाले नसल्याने दिसून आले. या योजनेच्या लाभार्थ्यांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत निराधार योजनेचे व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी हे मानधनासाठी तहसील कार्यालय व बँकेत मानधन जमा झाले का याची विचारणा करण्यासाठी दररोज पायपीट करीत आहेत.

पण गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना निराश होऊन परतावे लागत आहे एकीकडे केवायसी च्या नावाने बँकेत चक्रा माराव्या लागत आहे.

तर दुसरीकडे मानधन थेट खात्यात जमा करण्याकरिता तहसील कार्यालयात आल्या पावलीच परत जावे लागत आहेत. शासनाने निराधार लाभार्थ्यांकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचा गुढीपाडवा हा तरी साजरा होईल.
