

तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते. सुरुवातीला गावामध्ये वीज आली – नंतर गावात पाणी आले, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावात वॉटर सप्लायची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. परंतु आजवर कुठल्याही प्रकारच्या शासन प्रशासनाच्या माध्यमातून राबवत असलेल्या योजना जसे आदिवासींना प्रथम प्राधान्य देऊन पक्के घरकुल, गावातील रस्ते – नाल्या, शासनाच्या इतर योजना, तसेच गावात जाण्याकरता मुख्य रस्ता याचे पुनर्वसन झालेच नाही.

अशातच काही गावकऱ्यांच्या वतीने संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना ५२८ यांच्यावतीने हे गाव दत्तक घेण्यात आले होते.
गाव जंगल काठी असल्याने त्यांचे पुनर्वसन झाल्याने शासनाने आज रोजी सोळा वर्ष होऊनही कुठल्याही प्रकारच्या आदिवासी समाजाच्या विकासाकरिता उपाय योजना भाजप सरकारनी राबविल्या नसल्याचे निदर्शनास दिसून आले. स्थानीय घाटंजी तालुका प्रशासनाला गावकरी व संस्थेच्या वतीने वारंवार निवेदन देऊनही ( मा. आमदार राजू तोडसाम BJP ) यांनाही गावकऱ्यांच्या वतीने पूर्व सूचना देऊन भेटघेऊनही कुठल्याही प्रकारची ठोस कार्यवाहि पुनर्वसन झालेल्या आदिवासी गावाकरिता होत नसून.

अखेर संगम बहुउद्देशीय गवळी समाज संस्थेचे आदिवासी समाजाचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश नामदेव कोलवते तालुकाध्यक्ष घाटंजी संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना ५२८, अशोक मॅकलवर, दत्तू गोपावर, विनोद रावते, सटू बावणे, शंकर रावते, कोंडबा रावते, खुशाल पुरके, विश्वास गेडाम, देवराव रावते, मलेश मॅकलवार, वासुदेव नैताम, गंगाबाई कुंठावर, चंद्रकला मॅकलवर, सावित्रीबाई बावणे, पुनम गेळाम. या सर्वांच्या – गावकऱ्यांच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण आजपासून सुरू झालेले आहे.