
घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी समाजाला आजवर कुठल्याही योजनेचा लाभ देन्यात आला नाही. जसे घरकुल, गावात जाण्या-येण्याकरिता रस्ता व जनावरण करता गोठा तसेच शासनाच्या विविध योजना मिळत नसून स्थानिक घाटंजी तालुका प्रशासनाला आजवर विनंती तक्रार अर्ज सादर करूनही कुठल्याही प्रकारची स्थानिक तालुका प्रशासन घाटंजी हे दखल घेत नसून शेवटी समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिनांक 28 मार्च 2025 पासून गावातच आमरण बेमुदत उपोषण मांडन्उयात येईल असा इशारा संगम बहुउद्देशीय गवळी संघटना ५२८ च्या वतिने यवतमाळ जिल्लाधिकारी मीना यांना देन्यात आला आहे. संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री प्रकाशराव कोलवते यांच्यासोबत गावकरी आमरण उपोषनास बसत असून शासनाच्या वतीने त्वरित दखल घेऊन आम्हाला घरकुल तसेच रहिवाशी असलेल्या जागेचा ग्रामपंचायत च्या २०१६/२०१७ च्या यादीनुसार जागेचे पक्के पट्टे / घर टॅक्स पावती व गावात असलेले जुने देवाचे मंदिर त्याचे पुनर्वसन करून नविन बांधकाम करून देण्यात यावे. भिमकुंड (टेकडी) गेल्या पंधरा वर्षापासून भिमकुंड येथील रहिवाशी पैन गंगेच्या महापुरा मुढे भिमकुंड (टेकडी) या गावांमध्ये पुणरवसन होऊन राहत आहे. गेल्या १५वर्षापासून येतील असलेले रहिवाशी गावा लगतच लागून असलेल्या पैनगंगा नदीच्या महापुरामुळे 2010/11 च्या दरम्यान गावकऱ्यांच्या वतीने भिमकुंड टेकडी येथे पुनर्वसन करण्यात आले. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने गावातील रहिवासी नागरिकांना त्यादरम्यान मदतही करण्यात आली होती परंतु गेल्या २०१७ पासून तालुका प्रशासन घाटंजी यांच्या वतीने भिमकुंड (टेकडी) येथील नागरिकांवर अन्याय अत्याचार वारंवार घाटंजी तालुका प्रशासन करत असून (स्थानिकांच्या मते) तालुका प्रशासन व शासनाच्या वतीने प्रत्येक योजने पासून आधीवासी समाजाला वंचित आजवर वंचित ठेवले. तसेच रहिवाशी जागेचा घर टॅक्स व नमुना आठ जुन्या रेकॉर्डनुसार देण्याकरिता गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या वतीने तसेच घाटंची तालुका प्रशासनाच्या वतीने वंचित ठेवत असून त्यांच्यावर कार्यवाही करून आदिवासी समाजाला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा ही गावकर्यांनची विनंती आहे. तसेच सबंधित दोषीवर कार्यवाही झाली नाहीस स्थानिक रहिवाशी यांना न्याय मिडाला नाहीस तर अन्यथा भिमकुंड (टेकडी) येथील रहिवाशी हे संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना ५२८ च्या वतीने दिनांक २८ मार्च २०२५ पासून गावातच आमरण बेमुदत उपोषणा करीता बसत आहो असा इशारा संघटनेच्या वतीने घाटंची तालुका प्रशासनाला देण्यात सोबतच यवतमाळ जिल्हा प्रशासनाला देन्यात आला संबंधित विषयाकडे प्रशासनाच्या वतिने कुठल्याही प्रकारचे दुर्लक्ष न करता तातडीने दखल घ्यावी ही संघटनेच्या वतीने प्रशासनाला नम्र विनंती.
